प्रकल्पाचा इतिहास


                     रयत गुरुकुल प्रकल्प इतिहास

      अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ होण्याची गरज भासली म्हणून ग्रामीण विभागातील प्रज्ञावान व होतकरू मुलांचा शोध घेवून त्यांना सातारा शहरात सर्व शैक्षणिक सोयी पुरवून अध्यापकांच्या सानिध्यात राहण्याची संधी निर्माण करून देण्यासाठी याच विद्यालयात स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.अनिल पार्टील यांच्या प्रेरणेने रयत शिक्षण संस्थेचे जून १९९५ पासून रयत गुरुकुल प्रकल्प(निवासी)नियोजनपूर्वक सुरु केला आहे.1 तुकडी आणि 37 विद्यार्थ्यांवर सुरु केलेला हा प्रकल्प आज वटवृक्षा प्रमाणे विस्तारला आहे आणि अजून विस्तारतच आहे.

    या निवासी गुरुकुल प्रकल्पाचे सातारा शहर परिसरातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना याच प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे.असा स्थानिक पालकांचा आग्रह लक्षात घेऊन जून 1998 पासून म.स.वि.सातारा.मध्ये इ.५ वी ते ८ वी या वर्गासाठी अनिवासी गुरुकुल प्रकल्प सुरु करण्यात आला.प्रकल्पाचे यश पाहून स्थानिक स्कूल कमिटीच्या मागणीनुसार संस्थेच्या जवळजवळ सर्व  शाखांमध्ये अनिवासी गुरुकुल प्रकल्प वर्ग सुरु आहेत.तसेच संस्थेच्या दुर्बल शाखांत जानेवारी २०१५पासून मिनी गुरुकुल प्रकल्प सुरु करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा