सात्रळ कला प्रकल्प


सात्रळ कन्या रयत गुरुकुल प्रकल्प
     कर्मवीरांनी निर्माण केलेल्या समृद्ध वैचारिक बैठकीवरच त्याच्या निर्वाणानंतरही एका आत्मविश्वासाने संस्था शताब्दीकडे वाटचाल करीत आहे.आजचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बदलते संदर्भ लक्षात घेऊन सस्थ सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासठी वेगवेगळे प्रयोग करीत आहे.विद्यार्थ्यांना गुणात्मक दृष्ट्या प्रगल्भ व वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांचे तसेच प्रकल्पांच्या माध्यमातून केला जात आहे.यापैकी एक महत्वांकांक्षी प्रकल्प म्हणजेच कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित,’रयत गुरुकुल प्रकल्प’.
      ग्रामीण भागातील प्रज्ञावान व होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्व शैक्षणिक सोयी पुरवून अध्यापकांच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ राहण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यांच सर्वांगीण विकास साधण्याच प्रयत्न  ‘रयत गुरुकुल प्रकल्पा’ च्या माध्यमातून केला जात आहे.
   कर्मवीर अण्णांचे नातू डॉ.अनिल अप्पासाहेब पाटील याच्या संकल्पनेतून १९९५ साली सुरु झालेला हा रयत गुरुकुल प्रकल्प’संस्थेच्या अनेक शाखांमध्ये निवासी व अनिवासी अशा दोन्ही स्वरुपात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.
     आपला प्रवरा परिसर हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असून प्रगतीला शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाची जोड देवून प्रज्ञावान व सुसंस्करीत कन्यारत्ने घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे कन्या विद्यालय करीत आहे.सात्रळ च्या या कन्या शाळेमध्ये हा रयत गुरुकुल प्रकल्प’सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून  सुरु करण्यात आला आहे.
            थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील(माजी उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था,सातारा)
यांच्या प्रेरणा व सहकार्याने स्थापना झालेले हे विद्यालय मा.अरुण कडू पाटील(अध्यक्ष,उत्तर विभागीय सल्लागार मंडळ)यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टाकडे वाटचाल करीत आहे.प्रवरा परिसरातील त्यांचे सर्व सहकारी,पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ,पालक,थोर देणगीदार या सर्वांचे मौलिक सहकार्य देखील वेळोवेळी मिळत आहे हे विशेष....!


कर्मवीर विद्याप्रबोधिनी
रयत गुरुकुल प्रकल्प’
क्षेत्रभेट :-विषय:-
1.          वन परिसर
2.           नदी काठचा प्रदेश
3.           धरणे
4.           विद्युत प्रकल्प
5.           कारखाना
6.          बाजारपेठ
7.          आदिवासी प्रदेश
8.          ऐतिहासिक क्षेत्र
9.           पर्यटन स्थळे
10.                        संशोधन केंद्र  
11.                        शैक्षणिक संस्था
12.                        संग्रहालये
13.                        प्रशासकीय कार्यालय
14.                        मृदा,पाणी परीक्षण विभाग
15.                        धार्मिक स्थळे
16.                        हॉस्पिटल
17.                        बँका
18.                        पोस्ट ऑफिस
19.                        इ.टी.एम.सुविधा

   
कर्मवीर विद्याप्रबोधिनी
रयत गुरुकुल प्रकल्प’
गेस्ट लेक्चर विषय:-
o  व्यक्तिमत्व विकास
o  तणावमुक्ती जीवन
o  आरोग्य संवर्धन
o  स्पर्धा परीक्षा
o  पाणी समस्या
o  वनांचे महत्व
o  शिक्षणातील बदलत्या दिशा
o  स्रीचे सामाजिक जीवनातील महत्व
o  आर्थिक धोरण
o  व्यावसायिक बदलणारी क्षेत्र
o  करियर मार्गदर्शन
o  महिला सबलीकरण
o  योगा
o  कलाक्षेत्र
o  आहार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा