अभ्यासक्रम :-
मराठी,संस्कृत,इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्रे इत्यादी.विषय अद्यावत
शासनमान्य अभ्यासक्रमानुसार या
वर्गासाठी सेमी इंग्रजी माध्यमातून विशेष प्रयत्न करून शिकविले जात आहे.
अनिवासी गुरुकुल प्रकल्प:-
अनिवारी गुरुकुल प्रकल्पाची कार्यवाही निवासी गुरुकुल प्रकल्प वर्गासार्खीच
असते.अनिवासी विद्यार्थी प्रात:अभ्यासिकेस येताना आपले दोन वेळचे जेवण स्वतः बरोबर
आणतात.
शालेय वेळापत्रकापुर्वी दोन तास प्रात: अभ्यासिका व शालेय वेळापत्रकानंतर
एक तास अभ्यासिका घेतली जाते.
१.सेमी इंग्लिश :-शाखेमध्ये ज्या
वर्गातील या तुकडीसाठी गुरुकुल प्रकल्प आहे.त्या तुकडीसाठी सेमी इंग्लिश वर्ग सुरु
करण्यात यावे.
अध्यापन :- (१) प्रात:अभ्यासिकेच्या वेळी दोन
तास अध्यापन करणे आवश्यक आहे.हे अध्यापनाचे दोन तास एका शिक्षकाने सलगपणे
घ्यावयाचे नसून प्रत्येक तासासाठी वेगवेगळ्या शिक्षकाने अध्यापन करावयाचे आहे.
(२) एका तासाच्या अध्यापनासाठी PPT,LCD/Lab
चा वापर करावा त्यासाठी पूर्ण तयारी करावी.अध्यापन इंटरऑक्टिव्ह पद्धतीने
तसेच कृतियुक्त पद्धतीने करण्यात यावे किवा त्याऐवजी प्रयोगशाळेत विज्ञान प्रयोग
घेतला तरी चालेल.प्रयोग केला जात असताना शिक्षकाने प्रथम डेमो देऊन प्रयोग समजून
द्यावा.नंतर मुलांनी प्प्र्योग करावा.त्यावेळी शिक्षकाने पर्यवेक्षण करावे.आवश्यक
त्यावेळी मार्गदर्शन ही करावे.
३.रात्र अभ्यासिका :- रात्र अभ्यासिकेचे नियोजन
सखेच्या शानिक परिस्थितीनुसार दररोज एक किवा दोन तासांचे राहील.रात्र अभ्यासिकेला
शिक्षकांच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांनी अभ्यास करावयाचा आहे.(१)पहिली १०
मिनिटे इंग्लिश कम्युनिकेशन सराव घ्यावा.(Book Level I) इंग्लिश
कम्युनिकेशन सराव घेण्याअगोदर संवादाचे शिक्षकाने प्रात्यक्षिक करून दाखवावे व
नंतर मुलांच्या जोडी-जोडीकडून व गटा-गटाकडून त्या संवादाचा सराव करून घ्यावा. (२)प्रबोधीनीमार्फात
पुरविलेल्या इंग्लिश कम्युनिकेशन लेव्हल-I पुस्तकाचा वापर
व्हावा.
४.सूक्ष्मगुण मुल्यांकन:- प्रत्येक सत्र
परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक विषय शिक्षकाने प्रश्नानुसार सुक्ष्मगुण मुल्यांकन
करून लिखित मार्गदर्शन करावे.त्याची एक कॉपी विद्यार्थ्याकडे व एक कॉपी शिक्षकाकडे
द्यावी.
५.बाह्य तपासणी:- इ ९ वी व १० वी च्या उत्तरपत्रिकांची बाह्य
तपासणी केल्यानंतर त्यांचा स्वतंत्र निकल तयार करावा.जर त्यामध्ये काही फरक आढळला
तर त्याची कारणमीमांसा देण्यात यावी.
६.संगणक विषय :-(१)गुरुकुल तुकडीसाठी संगणक
विषय आठवड्यातून किमान चार तासिका होणे आवश्यक आहे.त्यासाठी आवश्यक ते रजिस्टर
ठेवावे.त्यामध्ये तपशीलवार नोंदी ठेवाव्यात.(२)एका तुकडीस एक या प्रमाणे एल.सी.डी.प्रोजेक्टर
व लॅपटॉप शाखेत असणे आवश्यक आहे.
७.इंग्रजी बातम्या:- (१)विद्यार्थ्यांनी दररोज
किमान दहा मिनिटे टीव्हीवरील इंग्रजी बातम्या पाहणे आवश्यक आहे.(२)आठवड्यातून एक
इंग्रजी न्यूज पेपर [ (i) Times Of India (ii)Indian
Express] आणून त्याचे वाचन आठवडाभर करावे.(३)दररोज
विद्यार्थ्यांच्याकडून प्रार्थनेच्या वेळी इंग्रजी बातम्या वाचून घेण्यात याव्यात.या
विषयी विद्यार्थांकडून पाठपुरावा करून घेण्याचे नियोजन करावे.(४)रात्र
अभ्यासिकेच्या वेळी इंग्लिश कम्युनिकेशन सराव घ्यावा.
८.इंग्लिश कम्युनिकेशन:- इंग्लिश कम्युनिकेशनसाठी
लेव्हल I ,II, व III स्वरुपात पुस्तिका तयार करण्याचे नियोजन झाले आहे.त्यापैकी लेव्हल I ही
पुस्तिका चालू वर्षामध्ये प्रकाशित झालेली आहे.या पुस्तिकेनुसार गुरुकुलच्या प्रत्येक
विद्यार्थ्यांची प्राथमिक स्वरूपातील इंग्लिश कम्युनिकेशनची तयारी करून घ्यावी.त्याविषयीचे
नियोजन व जबाबदारी सबंधित शिक्षकाकंकडे देण्यात
यावी.हे कामकाज होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालाल्वे.जरी सदर पुस्तिका इ ५ वी साठी
तयार केली असली तरी इ ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तिका
प्रथामिक स्वरूपातील इंग्लिश संभाषणासाठी अत्यंत उपयुक्त आहे
९.उपयुक्त पुस्तकांचे वाचन :-गुरुकुलच्या
प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयातील उपयुक्त अशा किमान १२ निवडक पुस्तकांचे
अवांतर वाचन झाले पाहिजे.त्यांची नोंद (पुस्तकाचे नाव,लेखन,वाचन पूर्ण केल्याची
तारीख,....)फाईलमध्ये स्वतंत्र कागदावर करण्यात यावी.याशिवाय वाचनीय पुस्तकांची
यादी प्रबोधीनिमार्फत पुरविली जाईल.
१०.हस्तलिखित :- गुरुकुल विद्यार्थ्यांच्या
वर्गावर किवा विषयवार हस्तलिखित तयार करण्यात यावे.त्यामध्ये कथा,लेख,चित्रे,विशेष
माहिती इ.चा समावेश असावा.सदरचे हस्तलिखित शाळेच्या नोटीसबोर्डवर असावे.गुरुकुलच्या
विद्यार्थ्यांचा ‘शब्दगंध’हा अंक दरवर्षी प्रकाशित करण्यात येणार आहे.सदर अंकासाठी
विद्यार्थ्यांचे उत्तम दर्जाचे लेखनसाहित्य पाठविणे आवश्यक आहे.
११.भाषा प्रकारानुसार वकृत्व स्पर्धा:-गुरुकुलच्या
प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी
मराठी/हिंदी/इंग्रजी/या भाषांतून वकृत्व स्पर्धा घेण्यात यावी.या प्रत्येक
प्रकारच्या वकृत्व स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.त्यातील
चांगल्या भाषणाची निवड करून गुरुकुल फीमधून पारितोषिके देण्यात यावी.(पारितोषिके
ही विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तके द्यावीत.)
१२.गेस्ट लेक्चर :- विद्यार्थ्यांसाठी
वर्षातून किमान ६ गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात यावीत.(प्रबोधिनी कार्यालयामार्फत
पुरविलेल्या विषयाच्या यादीनुसार)
१३.क्षेत्रभेट :-विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे
आयोजन करण्यात यावे.वर्षातून दोन क्षेत्रभेटी होणे आवश्यक आहे.( प्रबोधिनी
कार्यालयामार्फत पुरविलेल्यास्थळांच्या यादीनुसार).
१४.आय.क्यू.टेस्ट :-इ.१० वी मधील गुरुकुल
प्रकल्पातील विद्यार्थ्यांची आय.क्यू.टेस्ट करून घ्यावी.यासंबधीचे व्यवसाय
मार्गदर्शन वेळापत्रक प्रबोधीनिमार्फात कळविण्यात येईल.(कालावधी डिसेंबर ते
जानेवारी दरम्यान)
१५.विज्ञान प्रयोग सह्भाग :- (१)इ ५ वी ते १०
वीच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानचे सर्व प्रयोग प्रयोगशाळेत होणे
आवश्यक आहे.त्याबाबतच्या नोंदी स्वतंत्र रजिस्टर मध्ये ठेवण्यात याव्यात.त्यामध्ये
प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असावा.(प्रबोधिनी कार्यालयामार्फत पुरविलेल्या
नियोजनानुसार प्रयोग घ्यावेत)(२)शाखापातळीवर दरवर्षी विज्ञानप्रदर्शन घेण्यात
यावे.त्यातून क्रमांक काढून विजेत्यांना बक्षिस देण्यात यावे.
१६.करियर गायडन्स मार्गदर्शन:- इ.९ वी मधील
विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसमवेत इ.१०/इ १२ वी नंतर पुढील कोर्सेस च्या
संधीविषयी,करियर विषयी मार्गदर्शन घेण्यात यावे.
१७.गॅदरींग(वर्कशॉप):-दिवाळी/उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी
दोन दिवसांचे गॅदरींग(वर्कशॉप)
आयोजित करण्यात यावे.यामध्ये फनी गेम्स,काव्य वाचन
इ.चा समावेश असावा.विविध गुणदर्शन,क्रीडा,विविध स्पर्धा व परीक्षा गुणवत्ता
प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात यावा.(बक्षिसे पुस्तकरूपाने द्यावीत.)
१८.विद्यार्थी फाईल :- प्रत्येक
विद्यार्थ्याची गुरुकुल विषयी फाईल ठेवण्यात यावी.त्यामध्ये विद्यार्थी पालक यांचे
विषयीचे नियम,विद्यार्थ्यांच्या प्रगती अहवाल,गुणविश्लेषण अहवाल,विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण
यश इ.माहिती त्यामध्ये नमूद करावी.(प्रबोधिनीने पुरविलेल्या कव्हर पेज फाईलवरती चिटकवावे.)
१९.शिक्षक फाईल:- गुरुकुल शिक्षक वैयक्तिक (बायोडाटा)माहिती,विषय/वर्गाचा
एकत्रित निकल,विषयावर अभ्यासक्रम,प्रश्नपत्रिका इ.माहिती देण्यात यावी(माहितीसाठी
शाखांना प्रबोधीनिमार्फत शिक्षक डायरी दिली गेली आहे.त्याप्रमाणे शाखेतील प्रत्येक
शिक्षकाने शिक्षक डायरी भरावी.
२०.नोंद रजिस्टर :- प्रबोधीनिकडून पुरविण्यात
आलेल्या अभ्यासक्रम विषयक पीपीटी,सीडी,फिल्म्स,इतर फिल्म्स वेळोवेळी दाखविण्यात
याव्यात.त्याचप्रमाणे वाचन प्रकल्पातील पुस्तकांचा वापर करून त्याची नोंद रजिस्टर
मध्ये करण्यात यावी.
२१.खेळ साहित्य :-गुरुकुल प्रकल्पातील
विद्यार्थ्याना शाळेतील खेळ साहित्य वापरण्यात द्यावे.
२२.माहितीपत्रक :- प्रत्येक शाखेन स्वतंत्र
गुरुकुल माहिती पुस्तक तयार करावे.माहिती पुस्तकात शाखामाहिती,गुरुकुल प्रकल्पाची
माहिती,विविध वैशिष्ट्य,निकाल इ.समावेश असावा.
२३.गुरुकुल फी :- गुरुकुल फी विषयक जमा-खर्चाचे
खालीलप्रमाणे नियोजन करावे.
-
प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये गुरुकुल विद्यार्थ्यांची फी जमा करावी.
-स्थनिक परिस्थितीनुसार गुरुकुल फी आकारणी
करावी.सदर फी ठरविताना त्यास शाळा
समितीची व प्रबोधिनीची मान्यता द्यावी.
-गुरुकुल फी साठी स्वतंत्र कीर्द ठेवण्यात
यावी.
-गुरुकुलच्या फी ची सबंधित विद्यार्थ्यांना पावती देण्यात यावी.पातळीवर
गुरुकुल सुपरव्हिजन व स्टेशनरी खर्चासाठी मिळाले असा तपशील द्यावा.२४.गुरुकुल फी
मधून खर्चाचे नियोजन:-
(शाखा
बांधकाम,फर्निचर,इ. वर खर्च करावयाचा असल्यास पहिले दोन वर्षे करू नये.त्यानंतर दर
दोन वर्षांनी राखीव निधीतून खर्च करावा.)
-
राखीव निधी(३३ टक्के)एल.सी.डी.,डी.व्ही.डी.software,(३३टक्के)ग्रंथालय
(१० टक्के),पारितोषिके (५ टक्के),खेळ (५ टक्के),
गॅदरींग(वर्कशॉप) (५ टक्के),गेस्ट लेक्चर (४ टक्के),सुपरव्हिजन(५ टक्के),प्रबोधीनिमार्फात
पुरविवल्यागेलेल्या सर्व स्टेशनरीचे (विविध पुस्तके,सी.डी.,डी.व्ही.डी.)चार्जेस द्यावे
लागतील. सुपरव्हिजन चार्जेसव स्टेशनरीफी प्रतिवर्षी दि.१ डिसेंबरपूर्वी
विद्याप्रबोधीनीकडे पाठविण्यात यावी.
१)प्रकल्प प्रमुक :-मा.ए.के.निकम मोबा-९६२३००१०२९
B)प्रबोधिनी
कार्यालय :-
i)कार्यालय:- फोन ०२१६२-२३१०७४
ई-मेल आयडी : ryatgurukul@gmail.com
:kvp.rayat@gmail.com
ii)डॉ.अनिल पाटील
चेअरमन,कर्मवीर विद्याप्रबोधिनी
मोबा- ९४२३८२८०५१
ई-मेल आयडी : anil_a_patil@gmail.com
iii)प्रिं.आर.के.शिंदे
कार्यकारी संचालक,कर्मवीर
विद्याप्रबोधिनी
मोबा- ९४२३९५७६६५
iv)निवास जाधव,विभाग प्रमुख, कर्मवीर
विद्याप्रबोधिनी
मोबा-९५५०५५५९३९
v)आबाजी भोसले - कर्मवीर विद्याप्रबोधिनी
मोबा-९९२२२१०५७०
C)
वेबसाईट:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा