प्रस्तावना


रयत शिक्षण संस्था,सातारा
 कर्मवीर विद्याप्रबोधिनी
 रयत गुरुकुल प्रकल्प
                                  प्रस्तावना
           डॉ.पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने द्रष्टे महापुरुष होते.त्यांची विचारांची दिशा भविष्याचा वेध घेणारी होती.शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे ओळखून हजारो वर्षापासून शिक्षण न मिळालेल्या बहुजन सामाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाची गंगा तीर्थरूप अण्णांनी खेड्यापाड्यांत नेली. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.आज ही संस्था देशातील एक शैक्षणिक चळवळ बनली आहे.एका अर्थाने देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक वास्तवामध्ये विधायक परिवर्तन घडवून आणले आहे.
     ती अण्णांनी ग्रामीण भागातील प्रज्ञावान,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे जून 1940 साली महाराजा सयाजीराव मोफत व वसतिगृहयुक्त विद्यालयाची स्थापना केली.ती अण्णा 1940  ते 1949 या कालखंडात 10 वर्षे विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन होते.1994 पासून ती.अण्णाचे नातू डॉ.अनिल पाटील साहेब हे चेअरमन आहेत.ते  अण्णांच्या प्रमाणेच हे विद्यालय आणि संस्थेची विद्यालये नेहमी प्रगतीपथावर कशी राहतील,याकडे जातीने लक्ष देत आहेत.त्यांनी निवासी गुरुकुल प्रकल्प,अनिवासी गुरुकुल प्रकल्प,सेमी इंग्रजी याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा